
यावल (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या शिर्डी नगर परिषद येथील अधिकृत दौऱ्यादरम्यान आयोगाचे उपाध्यक्ष मा. श्री. मुकेश सारवान व विशेष कार्य अधिकारी श्री. राजेश सोनवणे यांनी विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान स्नेहा सोनवणे व इतर पदाधिकाऱ्यांनी शिर्डी येथे सदिच्छा भेट घेतली.
विशेष कार्य अधिकारी राजेश सोनवणे यांच्या सूचनेनुसार श्री साईबाबा संस्थान, शिर्डी यांच्या वतीने स्नेहा सोनवणे , आशा तडवी वंदना ताई पाटील वंदनाताई पाटील व उपस्थित पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी सफाई कर्मचारी वर्गाच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कामगारांच्या समस्या, त्यांचे हक्क आणि सामाजिक उन्नती यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. आयोगाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी आयोगाच्या उपक्रमांचे स्वागत करत सामाजिक बांधिलकी जपत सफाई कर्मचारी वर्गाच्या सक्षमीकरणासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

