
यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील मोहराळा गावात सर्रास दारू विक्री सुरू आहे.ही त्वरित बंद करून दारू व्यवसाय करणार आहेत अशांवर कारवाई करावी, व गावातील अवैध दारू विक्री बंद करावी. राज्यात कायद्याचे पालन केले जात आहे कायद्याचे पालन करणाऱ्या राज्यातच अवैध दारू विक्री सर्रासपणे गावात सुरू आहे यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झालेले आहेत महिला देशोधडी लागलेल्या आहेत. तरुण युवक दारूच्या व्यसनी मोठ्या प्रमाणाने जात आहेत. अनेकांचे दारूमुळे जीवन उध्वस्त झालेले आहे. पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी केलेल्या आहेत मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या व्यवसायांना कोणाचे पाठबळ आहे पाठबळ असणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी. त दारूबंदी करण्याकरिता आडगाव येथे सुद्धा मागणी केलेली होती . मात्र त्याचा काही परिणाम होत नाही. मोहराळे गावात दारूबंदी न केल्यास भीम आर्मी तीव्र आंदोलन छेडेलं, असा इशारा यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना निवेदन देताना केलेला आहे. निवेदनावर
गौरव सोनवणे. सतीश अडकमोल. विनोद अडकमोल. विशाल अडकमोल. गोविंदा सोनवणे. हर्षल अडकमोल. सचिन वानखेडे.
शुभम अडकमोल. सोहम गाजरे. समीर खाटीक. तय्यम शेख, यांचेसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

