
यावल (प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाने सरसकट कर्जमाफी जाहीर केलेली आहे या कर्जमाफीत सन 19 96 पासूनच्या सर्व वंचित थकबाकीदार शेतकऱ्यांना समाविष्ट करावे अन्यथा जनशक्ती प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह यावल तहसील कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण करणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. दहिगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेत सन 2006 2007 पासून बहुसंख्य वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अद्याप पर्यंत लाभ मिळालेला नाही. महाराष्ट्र शासनाने सन 2019 चे जीआर नुसार वंचित शेतकऱ्यांना समाविष्ट केले जाईल हे फक्त जाहीर केलेले आहे. यात त्यांनी वर्ष जाहीर केलेले नाही. त्यामुळे वंचित शेतकरी संभ्रमात आहेत. माननीय नामदार बच्चू कडू यांच्या मागणीनुसार सन 1996 पासून सर्व वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी आग्रही मागणी आहे त्यानुसार आम्ही दहिगाव परिसरातील वंचित शेतकरी यावल तहसील कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण करणार आहोत, याकरिता जे वंचित शेतकरी असतील अशांनी त्वरित हरिभाऊ पाटील मोबाईल नंबर 9881529086 ह्या नंबर वर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात केले आहे, या वंचित शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कुठलाही लाभ मिळालेला नाही. कर्ज बाजाराच्या बोजाखाली अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही, म्हणून शासनाने त्वरित वंचित शेतकऱ्यांसाठी वर्ष जाहीर करावे आणि त्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे.

