
यावल( प्रतिनिधी ) तालुक्यातील दहिगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील घराच्या उताऱ्यांवर फेरफार करणाऱ्या लिपिकास ग्रामपंचायतीने आज झालेल्या मासिक बैठकीत निलंबित केले. येथील ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिक रवींद्र शिवाजी पाटील याने हेमराज प्रभाकर पाटील यांचे घराचे उताऱ्यावर फेरफार करून त्यांचे नाव कमी करीत त्यांचा मयत भाऊ दिगंबर प्रभाकर पाटील याचे नावाचा उतारा देऊन त्यास महेंद्र फायनान्स कंपनीकडून दीड लाखाचे कर्ज देण्यास सहकार्य केले पंधरा दिवसातच दोन वेगवेगळे उतारे दिलेत याप्रकरणी हेमराज पाटील यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे कडे तक्रार दाखल केली होती. मात्र आम्ही यात काही करू शकत नाही असे उत्तर गटविकास अधिकारी मंजुषा गायकवाड यांनी तक्रारदारांना दिल्यामुळे. आणि हा निर्णय ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर घेऊ शकेल असा सोज्वळ सल्ला दिल्याने आज दिनांक सहा रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये ग्रामपंचायतच्या ठरावानुसार रवींद्र पाटील यास निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्याची प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी बोदडे आणि सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सर्वानुमते झालेल्या ठरावानुसार त्यास निलंबित करण्यात आले आहे.

