

यावल(प्रतीनिधी) तालुक्यातील साकळी जि.प शाळेत तालुका व जिल्हास्तरावरील शिक्षण अधिकार्यांची भेट, निपुण कलागुण सादरीकरणाचे केले कौतुक.विद्यार्थानी घेतली मुलाखत. साकळी जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव माननीय रणजीत सिंह देओल , जळगावसह तालुक्यातील शिक्षण अधिकारयाची भेट.यात जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) करिष्मा नायर मॅडम , शालेय शिक्षण उपसचिव माननीय तुषार महाजन , डेप्युटी डायरेक्टर माननीय संजय राठोड , जळगाव प्राचार्य अनिल झोपे , जळगाव शिक्षणाधिकारी( प्राथमिक) माननीय निलेश पाटील साहेब, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माननीय कल्पना चव्हाण मॅडम , यावल तालुका BDO माननीय मंजुश्री गायकवाड , जळगाव जिल्हा डायट अधिव्याख्याता वर्ग -1 माननीय चंद्रकांत साळुंखे साहेब, BEO यावल फिरोज पठाण , शा. पो. आ अधीक्षक यावल. माननीय मगर , यावल तालुका शिक्षण विस्तार अधिकारी सरोज पाटील ,दहीगाव केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय विजय ठाकूर , साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख शेख सर, माजी केंद्रप्रमुख किशोर चौधरी सर, साकळीचे सरपंच दीपक पाटील , सर्व मान्यवर यांनी शाळेला भेट दिली आणि निपुणबाबत सर्वांनी विद्यार्थ्यांशी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुलांशी संवाद साधला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षक समाधान कोळी यांनी केले. शाळेतील शिक्षिका .ज्योत्स्ना केदारे आणि रूपाली सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केली विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून देओल साहेबांनी जागेवर विशेष दोन्हीही शिक्षिकांचे आणि विद्यार्थिनींचे भरभरून कौतुक आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. आणि शाबासकीची थाप दिली. एवढे उच्चपदस्थ अधिकारी आपल्या शाळेत येणार आहेत हे ऐकून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये थोडे भीतीचे वातावरण होते परंतु साहेबांनी ज्या प्रकारे शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळा व हसत खेळत संवाद साधला त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्या मनातील भीती दूर झाली. विद्यार्थ्यांनी साहेबांची एक छोटीशी मुलाखत देखील घेतली. अतिशय मनमोकळा असा संवाद झाला. शिक्षकही साहेबां सोबत बोलण्यासाठी आतुर झाले आणि त्यांनी त्यांच्या विविध उपक्रमां विषयी माहिती दिली. देओल यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट असे निपुणबाबत, कलागुणांबाबत सादरीकरण पाहून त्यांनी खूप आनंद व्यक्त केला. साहेब एवढे उच्च पदस्थ असून त्यांनी अशा प्रकारे शिक्षकांशी आमच्या शाळेत पुन्हा पुन्हा येऊ असे मत व्यक्त केले आणि आनंद व्यक्त केला. देओल यांनी सर्व बाबींबाबत समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले, यावेळी निपुण, परिसर स्वच्छता शालेय पोषण आहार, विद्यार्थी शिस्त,गणवेश, विद्यार्थी सुरक्षा या सर्व बाबतीत पाहणी केली
यावेळी साकळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय मोहन पिंगळे सर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शोभा जैन,विशेष शिक्षक भास्कर पाटील शिक्षक संदीप केदारे , समाधान कोळी, मनीषा अलोने , प्रीती राणे, ज्योत्स्ना केदारे, रुपाली सोनवणे, सुभाष पाटील,भारत पाटील, ठाकरे सर, रवींद्र सूर्यवंशी या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

