
यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील तरुण व्यापाऱ्याने मका खरेदी करून शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयाचे जवळपास थकविले आणि पसार झाला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, तहसीलदार यावल, व यावल पोलीस ठाण्यात व्यापाऱ्या बाबत तक्रार केली आहे, दहिगाव येथील एका पिंजारी कुटुंबातील तरुण व्यापाऱ्याने गेल्या वर्षापासून मका खरेदीचा व्यवसाय सुरू केला होता, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना वेळेवर पैसे देण्यास त्याने प्रारंभही केला होता, मात्र काही काळातच त्याने शेतकऱ्यांचे मका खरेदीचे पेमेंट थकवण्यास सुरुवात केली, पेमेंट थकवल्यानंतरही यावर्षी देखील शेतकऱ्यांना सुरुवातीस मका खरेदीस रोख रक्कम देऊन त्यांचा विश्वास आत्मसात केला, आणि यातच दहिगाव आणि सावखेडा सिम येथील 35 ते 40 शेतकऱ्यांचे मका खरेदीचे लाखो रुपये थकविले आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत मका खरेदी केली जाते, शासकीय दरापेक्षा जास्त दर देऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेतले, शेतकरी त्याच्या विश्वासाला बळी पडलेत, जास्तीचा भाव मिळत आहे, म्हणून शेतकऱ्यांनी त्याचे कडे धाव घेतली, धान्य खरेदीचे पैसे रोख मिळतात या प्रलोभनाने शेतकरी भारावला आणि त्याचे कडे मका खरेदीसाठी गेला, शेतकऱ्यांना काही वेळेस रोख पैसे देऊन काही उधारीवर ठेवलेत, आज उद्या पंधरा दिवसानंतर, पेमेंट मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना तो लावित गेला, त्यात शेतकरी बळी पडत गेला आणि त्याला आपला म** देत गेला, प्रत्येक शेतकऱ्याचे प्रत्येकी एक लाख ते पंधरा ते वीस लाखापर्यंत मका खरेदीचे पेमेंट त्याचे कडे थकलेले आहे, पैसे देता येणार नाहीत या उद्देशाने तो गेल्या अनेक दिवसापासून पसार झालेला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे, आधी शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि त्यातच असले व्यापारी शेतकऱ्यांना बुडवीत आहेत हा प्रकार उघडकीस आला आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उज्जैनसिंग राजपूत यांना शेतकऱ्यांनी व्यथा मांडली, त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचे वर कार्यवाही करण्यासाठी तयार असल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे तहसीलदार मोहनमाला नाझरीकर आणि पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचीही शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना आप बीती तक्रार कळविली आहे. या परिसरात अनेक वेळा शेतकऱ्यांना कांदा खरेदी असो या मका खरेदी असो यात व्यापाऱ्यांनी फसवल्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत, निवेदनावर योगेश भागवत महाजन, ललित रमेश पाटील, देवेंद्र महाजन ,भूषण राजेंद्र गीते ,नंदकिशोर अहिरराव, योगेश प्रेमचंद महाजन, सुधाकर पाटील ,आणि अजय अडकमोल यांचे सह गावातील सावखेडासिम येथील 35 ते 40 शेतकऱ्यांचे सह्यांचे निवेदन आहे. आधीच निसर्गाने शेतकऱ्यांवर लहरी पणाने उपासमारीची वेळ आणलेली आहे, त्यात तो कर्जबाजारीही झालेला आहे, त्यातच व्यापारी पैसे बुडवण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत, अशा व्यापाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे,

