यावल प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या यात्रोत्सवात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत श्री विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतले. सात नवविवाहित जोडप्यांनी सकाळी पाच वाजता होम पूजा व पूजन केले. सकाळी दहा वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात आला यात चारशे पन्नास केळीच्या फण्या जगदीश गायकवाड यांचे मार्फत, तर स्वाभिमानी ग्रुप दहिगाव यांनी शंभर लिटर दुधाची चहा वाटप केली आणि तर हिंदवी स्वराज्य ग्रुप यांचे मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते जळगाव येथील रेड क्रॉस संस्थेने सहभाग नोंदविला यात 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. तर मंदिरात मार्फत 11 क्विंटल साबुदाणा फराळ वाटप करण्यात आला. तालुक्यातील शिरसाड साखळी सावखेडा सिम यावल आदी ठिकाहुन पायी दिंडी सोहळे दाखल झाले होते. मंदिरात शिरसाळ आणि यावल येथील भजनी मंडळांनी रंगत आणली. महाप्रसादासाठी व मंदिराच्या नियोजन करिता गावातील तरुणांनी व वृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पूजा अर्चाची दुकाने नारळाची दुकाने थाटली होती. सकाळी सात वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी दहिगाव कडे प्रयाण केले होते. सावखेडा सिम यावल नावरे मोहराळा कोरपावली महेलखेडी विरावली. किनगाव नायगाव यासह अनेक गाव भरातून भाविक दाखल झाले होते. विशेष करून चिमुकले देखील यात सहभागी होते. सायंकाळी पाच वाजता भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला.



