

यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्या लागत असलेले प्रसिद्ध निंबादेवी धरण आज नुकतेच दोन वाजता शंभर टक्के भरले. मात्र काही वेळातच धरणाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याजवळील मागील वर्षी खचलेला भराव पुन्हा यावर्षी खचलेला आहे आणि खचत आहे. याची गांभीर्याने प्रशासनाने दखल घ्यावी व तत्काळ हा भराव भरावा अन्यथा फार मोठा अनर्थ होण्याची भीती सावखेडा सिम . शिरसाड साकळी गावांमधून होत आहे. सन दोन हजार सहा सात मध्ये नागादेवी पाझर तलाव फुटल्यामुळे या गावांमध्ये कोट्यावधीचे नुकसान झाले होते ती पुनरावृत्ती होऊ नये याकरिता प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात आणि होणारा अनर्थ टाळावा अशी मागणी होत आहे. पक्क्या बांधकामामध्ये असणारी भिंत बोगस कामाचे एक प्रतीक आहे असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.असणारी भिंत बोगस कामाचे एक प्रतीक आहे असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. निंबा देवी धरणाच्या पायऱ्या जवळील भिंत व भराव खचण्यास सुरुवात झाली आहे, तिचा बांधकामाचा प्रस्ताव आम्ही पाठविलेला आहे, त्याचे लवकरच बांधकाम होईल उद्या तेथे भेट देण्यासाठी जाणार आहोत. मात्र खचलेल्या या प्रकाराचा धरणाला कुठलाही तळा जाणार नाही कुठलाही धोका निर्माण होणार नाही शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि भीती बाळगू नये. असे अभियंता शुभम पाटील यांनी म्हटले आहे.

