

यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथे सतत धार पावसाने गुरांच्या गोठ्यासह घरात पाणी शिरल्याने हजारो रुपयांचे गुरांचा चारा ओला झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दहिगाव येथील सुरेश आबा नगरात पाण्याचा तलाव साचला येण्या-जाण्याचा रहिवाशांना त्रास होत आहे. तर येथील सावखेडा सिम रस्त्यालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यांमध्ये गटारीचे काम अपूर्ण केल्यामुळे पाणी शिरले आहे तर एका घरात पाणी शिरून चीज वस्तू खराब झालेले आहेत. नथू शिवराम पाटील आणि सुनील धनराज पाटील यांचे घरात आणि गुरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने हजारो रुपयांचा चारा ओला झाला गुरे सुद्धा पाण्यातच आहेत. या ठिकाणी बांधकाम केलेल्या गटारीचे अपूर्ण काम केल्यामुळे हे पाणी या गोठ्यांमध्ये शिरले आहे. दरवर्षी पाणी कितीही आले तरी या गोठ्यांमध्ये पाणी शिरत नव्हते असे रहिवाशांचे म्हणणे आहे. पाण्याचा निचरा व्यवस्थित न काढल्याने आणि ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झालेला असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. गटारीतून वाहून जाणारे पाण्याचे नियोजन संबंधित ठेकेदाराने करावे आणि याकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ करीत आहेत. तर दुसरीकडे आदर्श विद्यालयासमोर असलेल्या नाल्याला पाणी आल्याने चिमुकले या पाण्याचा आनंद घेत असताना दिसून येत आहेत. सुनील पाटील यांचे घरात पाणी शिरले यात त्यांच्या काही वस्तू पाण्यामध्ये भिजलेले आहेत.
[विजेच्या तार तुटल्याने सुरेश आबा नगरा त24 तास वीजपुरवठा खंडित भर पावसात वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा केला सुरळीत. दहिगाव ता यावल सततच्या पावसामुळे मेन लाईनवर झाड कोसळल्याने तसेच वीजतारा तुटल्याने सुरेश आबा नगरात 24 तासापर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला तर गावात पाच तास वीस पुरवठा खंडित राहिला यामुळे सुरेश आबा नगरवासी यांना अंधारात राहावे लागले. मात्र जीवाची परवा न करता वीज कर्मचाऱ्यांनी भर पावसात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले वीज प्रवाह सुरू असलेल्या तारांवर फॉल्ट निघाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तर गावात पटेल वाड्यामध्ये प्रमुख वीज प्रवाह वाहणाऱ्या तारांवर झाड कोसळल्याने पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. तत्काळ वीज कर्मचाऱ्यांनी झाड हटवून वीजतारा सोडून विविध पुरवठा सुरळीत केला. आज सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला या कामी हमीद तडवी योगेश महाजन

