
यावल(प्रतिनिधी) यावल शहरातील डांगपुरा भागातील मन्यारवाडा येथे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांचे पथकाने गोपनीय माहितीवरून तळ घरात असलेल्या सात जनावरांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली व त्यांना गोशाळेमध्ये रवाना केले आहे याप्रकरणी चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या पुण्यात वाढ करण्यात आली आहे . त्यांना न्यायालयाने 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. आरोपी सय्यद रशीद निसार कुरेशी सय्यद आसिफ सय्यद निसार सय्यद हबीब सय्यद निसार. सै, अन्सार सय्यद निसार.
त्यांच्याकडून 65 किलो दोन जिवंत गाई अधिक दोन जिवंत गोरे आणि तीन म्हैस वर्गीय जनावरे अशी एकूण सात जनावरे यावल पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच कत्तलीसाठी वापरले जाणारे लोखंडी कुराळ कोयता सुरी दोरी वजन काटा इत्यादी साहित्य. यासह त्यांनी या सात जनावरांना 25 ऑगस्ट रोजी असणाऱ्या बकरी ईद रोजी कत्तल करण्यासाठी तळघरात कोंडून ठेवले होते. म्हणून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम पाच, पाच, अ 9,9क11 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 112 संघटित गुन्हेगारीचा वाढीव कलम लावण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना आज यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे , यापूर्वी आरोपी नंबर एक याचे विरुद्ध दोन गुन्हे दाखल झालेले आहेत.

