


यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील सातपुडा पर्वतातील वडरी धरणाच्या पाठोपाठ आज निंबादेवी आणि हरिपुरा धरण 100% भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे येत्या दोन दिवसात मनुदेवी वाघझिरा मोर धरण हेही भरतील असा विश्वास अभियंता फारुख गवळी यांनी व्यक्त केला आहे निंबादेवी धरणाने सावखेडा सिम नायगाव चुंचाळे, विरावली आदि गाव शिवारात विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच सातपुड्याच्या कुशीत असलेल्या हरिपुरा धरणातही हरिपुरा धरणाचा एकूण पाणीसाठा 5.997 दलघमी एवढा असून जिवंत पाणीसाठा पाच पॉईंट 188 दल घमी आहे . हे धरण परिसरात मोठे असून याचा मोहराळा हरिपुरा विरावली सातोद कोळवद वडरी परसाळे आदी गावांना लाभ मिळणार आहे. असे फारूक गवळी अभियंता यांनी म्हटले आहे. वडरी. हरिपुरा निंबादेवी तिघ धरण भरल्याने आता विहिरींच्या पाण्या त वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. गेल्या तन दिवस सतत दार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. हळकाई खळकाई नदीला पूर आलेले आहेत. भोनक नदीला पाणी आले होते.
एकुण पाणी = 5.997 दलघमी
[१/८, १३:१८] अभियंता फारुख गवळी जळगाव: जिवंत पाणी साठा = 5.188 दलघमी

