यावल( वा ) तालुक्यातील दगडी येथे धरती आबा योजना अंतर्गत मराठी मुलांच्या शाळेत मोफत आरोग्य तपासणी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात महिलांची बीपी शुगर व विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
या शिबीरात शिरसाड उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारीडॉ. असमा परवीन नमो उद्दीन शेख, आरोग्य सेवक राजेश्वर निकुम,अधिपारिचरीका वृषाली पाटील यांनी आरोग्या विषयी माहिती दिली व आजारी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. गावात व शिवार फेरी काढून गावातील समस्यांविषयी नागरीकां कडून माहिती घेण्यात आली .
या शिवार फेरी मध्ये गावातील सदस्य , पोलीस पाटील , विठ्ठल कोळी, ग्रामसेवक भरत पाटील, पत्रकार . गोकूळ कोळी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका , आशा वर्कर ज्योती मोरे, रंजना कोळी, पूनम पाटील उपस्थित होते
,दगडी जि.प शाळेचे मुख्याध्यापक इश्वर तागड , आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील,राजू पावरा ग्रामपंचायत कर्मचारी गणेश पाटील यांनी धरती आबा अभियान अंतर्गत जन सुनावणी कार्यक्रमास सहकार्य केले .


