यावल ( प्रतिनिधी)तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गाडरया येथे दिनांक 21 मे चे रोजी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी पावसाने फार मोठे नुकसान झाले आहे यात सौर ऊर्जा प्लेट आणि आठ विजेचे काम तसेच छतावरील पत्रे उडालीत. याप्रकारे 21 मे च्या सायंकाळी घडला. अनेक घरांच्या छतावरील पत्रे सिमेंटचे पत्रे देखील उडाल्याने ते आदिवासींना उघड्यावर यावे लागले आहे, यात त्यांचे प्रत्येकी हजारो रुपयांचे नुकसान झालेले आहे. आठ विजेचे खांब कोसळल्याने गावातील वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झालेला आहे वीज कंपनीने दुरुस्तीचे काम हाती घेतलेले आहे. तर अनेक घरांवरील सौर ऊर्जेचे पॅनल खाली पडून तुटून त्यांचे नुकसान झाले असून सुदैवाने नैसर्गिक आपत्तीमुळे कुठली जीवित आणि झाली नाही. मात्र त्यांच्या आर्थिक नुकसान व धान्य ओले झाले आहे झालेल्या प्रकाराचा त्वरित पंचनामा करून आदिवासींना नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी आदिवासींकडून केले जात आहे.
गाडरया येथील सौर ऊर्जा प्लेटचे नुकसान भरपाई कंपनी ला दिलेल्या तक्रारीवरून कंपनी पंचनामा करून आदिवासींना पुन्हा बसवून देईल मात्र ही सौर ऊर्जा प्लेटची मुदत संपलेली नसावी बसवल्यापासून पाच वर्षाच्या आत कंपनी नुकसान भरपाई देते. वीज वितरण कंपनीचे अभियंता यावल यांनी म्हटले आहे. तर कोसळलेले वीज कामचोरित बसवण्याचे काम आम्ही हाती घेतलेले आहेत ते मार्गी लागेल आणि वीज पुरवठ्यातील अडचणी दूर होऊन वीजपुरवठा सुरळीत होईल असे वीज कंपनीचे यावल येथील अभियंता फेगडे यांनी म्हटले आहे,


