यावल(प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील कुसुंबा बुद्रुक येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या वतीने भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. होते, या सोहळ्यात समाजातील अनेक मान्यवर, व लोकप्रतिनिधींनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती लावून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्यात..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिर तडवी हे होते, तर उद्घाटन सेवानिवृत्त डीवायएसपी रशीद तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय युवा अध्यक्ष, नवी दिल्ली यांनी आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करीत आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर समाजाने एकजूट राहण्याचे आवाहन केले. त्यांनी समाजाच्या हक्कांसाठी प्रखर मत व्यक्त करत युवकांनी शिक्षण व संघटन यावर भर द्यावा असे सांगितले.
या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण १५ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. संपूर्ण पाहुण्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली, काही व्यावसायिकांनी थंडपणे व कोल्ड्रिंक्स स्टॉल लावल्याचे दिसून आले,आयोजकांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडत समाजासमोर आदर्श निर्माण केला. साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि अनाठायी खर्चाला आळा देत पार पडलेल्या या सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. मान्य वरांच्या हस्ते वधू वर यांना भेट वस्तू देण्यात आल्या,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळ, समाज बांधव व युवकांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतल्याने संपूर्ण समाजातून टीमचे कौतुक केले जात आहे


