यावल प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने 2019 चा जीआर रद्द करून सरसकट कर्जमाफी करावी आणि वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी दहिगाव येथील शिवसेनेचे कार्यकर्ते तथा प्रहार चे तालुकाध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांनी सहकार मंत्री यांचेकडे केलेली आहे. याकरिता गरजू शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केलेले आहे. त्यांनी हरीभाऊ रत्नाबाई विजय पाटील दहिगांव तालुका यावल जिल्हा जळगांव आज दिं 4/6/2026 रोजी गुरूवार सकाळी महाराष्ट्र सरकार, सहकार मंत्री मा ना बाबासाहेब मोहनराव पाटील यांना दहिगांव वि,का,स सहकारी सोसायटी कर्ज माफी साठी फोन लावला त्यांना विचारले की आम्ही दहिगांव मधील मागील शेतकरी कज॔ माफी मध्ये बसत नसल्यामुळे तुम्ही आमच्या साठी प्रयत्न करा अशी विनंती केली आणि सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य मा ना बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी मी समिती समोर आपला विषय मांडतो असे सांगितले आहे, याकरिता दहिगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी एक वाटण्याची गरज आहे त्यासाठी प्रत्येकाने संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केलेले आहे. पुढील नियोजनासाठी प्रत्येकांच्या पाठिंब्याची गरज आहे. कर्जमाफीमध्ये कुठलेही निकष न लावता कर्जमाफी करावे आणि अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा असे त्यांनी म्हटले आहे.


