यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील विरावली रस्त्यावर ठेकेदाराकडून अनेक वेळा पाईप लाईन फुटत असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे . दहिगाव विरवली रस्त्यादरम्यान गावालगत असलेल्या नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे हे काम करीत असताना गेल्या महिनाभरात अनेक वेळा ठेकेदाराकडून पाईपलाईन फुटली गेलेली आहे. त्यामुळे सुरेश आबा नगरात होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही परिणामी ग्रामस्थ प्रशासनावर व ठेकेदारासंदर्भात संताप व्यक्त करीत आहेत. संबंधित ठेकेदार मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सध्या उष्णतेची लाट आहे त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थाला पाण्याची अत्यावश्यक गरज असते आधीच विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे त्यातच ही पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रोजचे वाया जात आहे, आताही गेल्या काही दिवसापासून ही पाईपलाईन फुटलेली आहे मात्र ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत आहे या प्रकाराकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी ठेकेदाराला समज द्यावी आणि पाईपलाईन जोडून घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


