यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथे गटारी व्यवस्थित निघत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तर केरकचरा वाहतूक व्यवस्था सुरळीत रहात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे, दही गावातील वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक पाच आणि इतर भागात गटारी काढल्यानंतर गटारीच्या बाजूला टाकलेली घाण लवकर उचलली जात नाही गावात ट्रॅक्टर अनेक दिवसापासून फिरले नाही म्हणून दिगारे पडून आहेत आणि त्यातच गटारी तुडुंब भरलेल्या आहेत परिणामी गटारीत केरकचरा साचलला दिसून येत आहे , या घाणीच्या साम्राज्यामुळे मच्छर , डासांचे प्रमाण वाढलेले आहे यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात जाण्याची भीती निर्माण झालेली आहे या प्रकाराकडे मात्र प्रशासन सुस्त झालेले दिसत आहे कर्मचारी ट्रॅक्टर द्वारे केरकचरा उचलत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे हा केरकचरा त्वरित उचलावा गटारी साफ कराव्यात आणि रोगराईला दिलेल्या आमंत्रण रद्द करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सध्या अनेक आजार उद्भवत असल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे संकेत ग्रामस्थ वर्तवित आहेत. गावात महिलांनी आपापल्या घरातील केरकचरा ग्रामपंचायतीने वाटप केलेल्या साधनांमध्ये साचून ठेवलेला आहे मात्र तो पडूनच असल्याने तिथे डासांचे प्रमाण वाढलेले आहे ही गंभीर बाब आहे याकडे आरोग्य विभागाने लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत ट्रॅक्टर द्वारे गावातील ढिगारे ज्यावेळेस वाहतूक करून गावाबाहेर टाकत असते हे ढिगारे चुंचाळे रस्त्यावर काही शेतकऱ्यांच्या बांधालगत टाकलेले असल्यामुळे त्यातील प्लास्टिकची कागद पिशव्या त्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये उडून जात आहेत परिणामी त्याचा परिणाम शेतीवर होत आहे ढीगारे टाकल्यावर ते पेटवून टाकावेत अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत



