आमोदा येथील तेरा वर्षीय मुलीच्या डोक्यात टीव्ही संच पडल्याने ती गंभीर जखमी होऊन मयत झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली याबाबत यावल पोलिसात मुलीच्या वडिलांनी खबर दिले वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, गावात शोककळा पसरली आहे. आमोदा येथील नाजमीन मोहम्मद इसाक पिंजारी वय 13 ही रविवारी पहाटे तिचे घरात असताना घरातील रिकाम्या कोठीवरील टीव्ही संच तिचे डोक्यात अचानक पडल्याने ती गंभीर जखमी झाली तिला भुसावळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी तिला मयत घोषित केले याबाबत ई-मेल द्वारे वरिष्ठांना माहिती कळवण्यात आली असून या संदर्भात यावल तहसीलदार मोहनमाला नाझरीकर यांचे कडे कळवण्यात आले आहे . घटनेची खबर मुलीचे वडील मोहम्मद इसाक इस हाक पिंजा री वयोतीस धंदा मजुरी यांनी यावल पोलिसात माहिती दिल्यावरून भारतीय नागरी सुरक्षा संहिता बी एस डबल एस कलम 194 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेहनुद्दीन सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार हे करीत आहेत मयत मुलीचे सेवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी गौरव भोईटे यांनी केले. सदर घटनेबाबत आमोदा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे गरीब घराण्यातील ही मुलगी असून आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.


