यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांनी आज दिनांक 14 रोजी दुपारी कृषी मंत्री दत्ता भरणे यांचे पी ए, सोबत भ्रमण दूरध्वनी वरून दहिगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 376 थकबाकीदार शेतकऱ्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली, या चर्चे बाबत मंत्र्यांना आम्ही तुमची तक्रार कळवतो, असे आश्वासन त्यांनी दिले आहे, हरी पाटील यांनी म्हटले आहे की आमच्या दहिगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेत दहिगाव येथील 188 आणि सावखेडा सिम येथील 88 थकबाकीदार शेतकरी आहेत, हे सर्व शेतकरी आपण लावलेल्या निकषात बसलेले नाहीत , सन 2006 सन 2007 सन 2008, या वर्षापासून हे सर्व शेतकरी थकीत आहेत आपण दिलेल्या कर्जमाफीत आम्ही कुठेही बसलेले नाहीत, अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा विचार येत आहे, बच्चू कडू यांनी केलेल्या मागणीचा विचार करावा आणि आमच्या या समस्या आपण सोडवाव्यात, त्यावर तोडगा काढून सण 2017 आणि सन 2019 मध्ये झालेल्या कर्जमाफीत आम्ही शेतकरी बसलेले नाहीत, आपण सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट कर्जमाफी करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे त्यांनी म्हटले आहे . त्यावर पीए यांनी सर्व चर्चा असा विश्वासही त्यांनी दिला आहे.


