यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा सिम येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी भेट देऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले, पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घरी इंग्रजी गणित आणि मराठी या भाषेचे ज्ञान देऊन त्यांना निपुण मध्ये सहभागी करावे व आपली शाळा उत्तम कशी होईल यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नायर मॅडम यांनी केले. त्यांचे असते विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तक वाटप करण्यात आले, इयत्ता पाचवी मधील कोमल सोनवणे या मुलीने नायर मॅडम यांची प्रखर मुलाखत घेत त्यांचे मत जिंकून घेतले त्याबाबत तिचं कौतुक केले, त्यांच्या उपस्थितीत गावातून बैलगाडी सजावट करून इयत्ता पहिलीतील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली लेझीम पथक आणि आदिवासी गीतात त्यांचा गौरव करण्यात आला, यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मीना तडवी, मुख्याध्यापक नामदेव गुरुजी, पोलीस पाटील पंकज बडगुजर, सेवानिवृत्त शिक्षक छबीर तडवी गुरुजी, लक्ष्मण बडगुजर, अकबर तडवी, यांचे सर्व शिक्षक वृंद शिक्षिका उपस्थित होत्या पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची उत्तम प्रकारे उपस्थिती होती, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत तिथे विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, केंद्रप्रमुख विजयकुमार ठाकूर, व पंचायत समिती अधिकारी उपस्थित होते, दरम्यान सावखेडा सीम येथल प्राथमिक आरोग्य केंद्रातही मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली व रुग्णांची विचारपूस केली, याप्रसंगी गावकऱ्यांनी चर्चा केली व वैद्यकीय अधिकारी भंगाळे आणि यांच्याशी चर्चा करण्यात आली, प्रसंगी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते,



