यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील पीएम किसान लाभार्थ्यांनी 30 जून पूर्वी *ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा पुढील मिळणारा लाभ बंद होईल असा इशारा शासनाकडून देण्यात आलेला आहे. नजीकच्या सामायिक सुविधा केंद्रावर (सी,एस,सी) जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण द्वारे,
फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळख) पद्धत
‘PM-KISAN’ मोबाईल अॅप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे (Face Authentication).
दिव्यांग वृद्ध शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा
गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) व क्षेत्रीय कर्मचारी वैयक्तिकरित्या लक्ष देऊन “फेस ऑथेंटिकेशन” द्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. याकरिता ची अंतिम मुदत 30 जून 2026 असून विहित मुदतीत पूर्ण न केल्यास आगामी हप्ते थांबतील असा इशारा देण्यात आलेला आहे. तरी लाभार्थ्यांनी त्वरित आपली केवायसी करून घ्यावी असे आवाहन कृषी अधिकारी भरतवारे कृषी सहाय्यक कैलास बारेला, आणि मीना तडवी यांनी केले आहे,


