
यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील दहीगाव सार्वजनिक विठ्ठल रुक्माई मंदिराच्या समोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मतदार पुनरिक्षण एस आर आर कॅम्पच्या पहिल्या दिवशी मतदारांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. दोन दिवसात संपूर्ण गावाचे मतदार पुनरिक्षण आटोक्यात येईल असा विश्वास आयोजक निलेश पाटील यांनी दाखविला आहे. या कामी शासनाने नेमणूक केलेले चारही बीएलओ. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांमधून बी एल ओ टू चे चार प्रतिनिधी पुंडलिक पाटील . शैलेश पाटील, पी, डी चौधरी, नितीन पाटील, यांनी मतदारांचे एस आर फॉर्म भरण्यास सुरुवात केली. यात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे पहिल्याच दिवशी. 100 च्या वरती अर्ज भरण्यात आलेले आहेत, याचा मी तलाठी मिलिंद कुरकुरे तसेच जिल्हा परिषद शाळा. उर्दू शाळा
माध्यमिक शाळा. यांनीही उपस्थिती दाखवून आपले कर्तव्य पार पाडले आहे आणि पाडत आहेत. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता बघून सर्वांचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरणे सुरू आहेत.

