
यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा सिम येथील पंढरपूर वारी करणाऱ्या भाविक महिलेचा अपघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. सावखेडा सिम येथील अंजनाबाई रामलाल पाटील वय 65 ही पंढरपूर येथे वारी करिता बसने गेली होती, ती गंणगापूर तुळजापूर करून पंढरपूरच्या मार्गे मोहोळ येथे शौचाला जात असताना महामंडळाच्या बस क्रमांक एम एच 14 एन इ 71 60, हिने जोरदार धडक मारून ती गतप्राण झाली 30 तत्काळ तेथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले आहे याबाबत माहोळ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या सदर्भात आमदार अमोल जावळे यांना भाजपा कार्यकर्ते दिनेश पाटील, कमलाकर पाटील यांनी कळविले असतात तात्काळ त्यांनी दखल घेत प्रेताचे सेवविच्छेदन करण्याचे सांगितले यावरून प्रेत त्वरित तेथील डॉक्टरांनी ताब्यात दिले आहे. त्यांच्या वर सावखेडा सिम येथे दिनांक 24 रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पती दोन मुलं सुना नातवंडे मुली असा परिवार आहे. त्या रामलाल नागो पाटील यांच्या पत्नी होत.

