यावल प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील मुख्याध्यापक पी.बी.पाटील हे दि. 31 मे रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. . त्यांनी 28 वर्ष सेवा केली. त्यांचे अध्यापनाचे विषय इंग्रजी व शारीरिक शिक्षण हे होते. त्यांच्या सेवाकाळातील अनेक विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात कार्य करीत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी,संरक्षण, कृषी, शिक्षण, राजकारण, सहकार व्यापार इ.क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे काही विद्यार्थी खेळाडू राज्यस्तरावर व्हाॅलीबाॅल, कुस्ती इ. क्रीडा प्रकारात सहभागी झाले. त्यांना ‘जळगांव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे ‘ 2022 मध्ये ‘जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
मागील तीन वर्षांपासून ते शाळेचे मुख्याध्यापक पद सांभाळत आहेत. शै.वर्ष 2024-2025 मध्ये शाळेला राज्यशासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ प्रतियोगीतेत तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचे बक्षिस प्राप्त झाले.शालेय परसबाग स्पर्धेतही बक्षिस मिळाले.गांधीतिर्थ जळगाव आयोजित राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगीतेत उत्तेजनार्थ ट्राॅफी शाळेला मिळाली.राज्यस्तरिय बाल लोकनृत्य स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थी गटास उत्तेजनार्थ बक्षिस व ट्राॅफी मिळाली. विज्ञान प्रदर्शनातही तालुकास्तर प्रयोगशाळा सहाय्यक गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
तसेच सहशालेय उपक्रमांमध्ये सहल,स्काऊट गाईड कॅम्प,सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा इ. तसेच नवोपक्रमात आंतरकुल विज्ञान प्रदर्शन, आंतरकुल चित्रकला व हस्तकला प्रदर्शन इ. उपक्रम उत्साहाने शाळेत आयोजित केले.
वरील सर्व उपक्रमांसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंथू भगिनींनी आपापले नियमित अध्यापनाचे कार्य सांभाळून उत्साहाने सहभाग घेऊन शाळेचा नावलौकिक कायम राखला. वरील सर्व उपक्रमात माजी सहकार्यांचेही मार्गदर्शन लाभले. माजी विद्यार्थ्यांनीही मदतीचा हात दिला.
सहकाऱ्यांच्या सहकार्य व कल्पकतेचा लोकशाही पद्धतीने सर्वांच्या विचारविनिमयातून निर्णय घेऊन प्रत्येक उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. सर्व उपक्रमांना संस्थेचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन महत्वपूर्ण होते.
सेवापूर्ती निमित्त निरोप घेताना ज्यांच्यामुळे सेवा सफल झाली ते सर्व विद्यार्थी,सहकारी,संस्थाचालक, विद्यार्थी पालक,गांवातील सर्व संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी,माजी सहकारी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, विविध शिक्षक संघटना व त्यांचे पदाधिकारी यांच्या सहकार्याबद्दल पी.बी.पाटील सरांनी कृतज्ञता व्यक्त केली.


