यावल प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील प्रमुख चौकातील पिंपळाच्या झाडाची फांदी फाटत असताना अचानक गावकऱ्यांचे लक्ष गेल्यामुळे फार मोठा अनर्थ टळला या झाडाखाली बहुसंख्य ग्रामस्थ बसलेले असतात, तसेच पिंपळाच्या बाजूला पान टपरी व्यवसाय दुकानदार आहेत ,तर एका बाजूला रहिवास आहे. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पिंपळाच्या फांदी फाटल्याचा आवाज तिथे बसलेल्या लोकांना आला आणि त्यांनी तिथून पळ काढला. त्वरित ग्रामपंचायतीचे उपसरपंच देविदास पाटील यांनी दखल घेत मजूर आणून पिंपळाचे पूर्ण झाड उतरविले. या तुटलेल्या फांदीमुळे वीज कंपनीच्या तारा मात्र तुटल्यात. तारा जोडण्याचे काम वीज कंपनीचे कर्मचारी हमीद तडवी आणि सुनील कोळी यांनी केले. या पिंपळाच्या सभोवताली अनेक लोक गप्पागोष्टी करीत बसत असतात त्याचप्रमाणे याच चौकात दुसरा एक मोठा पिंपळाचा वृक्ष आहे त्यालाही पंचायतीने काढून घ्यावा अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत. झाड कुचके होत आहेत आलेल्या वादळामुळे फांद्यात तुटण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. पिंपळाचे झाड तोडून मोकळे झाले त्या जागी शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या खोल्या उभाराव्यात आणि व्यावसायिक तरुणांना व्यवसाय मिळवून द्यावा अशी अपेक्षा ग्रामपंचायतीकडून नागरिक करीत आहेत.



